सावंतवाडी । प्रतिनिधी : माजगाव येथील महिलांसाठी आयोजित आरोग्य तपासणी शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. माजगाव जि.प. शाळा नंबर १ येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन माजगाव सरपंच डॉ. अर्चना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी माजी जि.प. सदस्या सौ. रेश्मा सावंत, उपसरपंच संतोष वेजरे, ग्रा.प . सदस्य संजय कानसे, डॉ. सुप्रिया धाकोरकर, डाॅ. पूर्वा राऊत.डाॅ प्रणाली पाटील. डाॅ रिजवान बोबडे डाॅ संजय जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
पडवे येथील एस एस पी एम मेडिकल कॉलेज आणि लाइफटाईम हॉस्पिटल यांच्या संयुक्त विथ्यमाने हे शिबिर घेण्यात आले.प्रास्ताविकात डाॅ. सुप्रीया थाकोरकर यांनी स्तनांचा कक॔रोग, मॅमोगाफी, ईसीजी, तोंडाचा कर्करोग यांची तपासणी याबाबत माहिती दिली. या शिबिराला गावातील महिलांनी उपस्थित राहत शिबिराचा लाभ घेतला.











