बहिरवली मोहल्लामध्ये मध्यरात्री घराला आग, लाखोंचे नुकसान

खेड नपच्या अग्निशमन दलाने आग आणली आटोक्यात 
खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील बहीरवली न १  मोहल्ला येथे  बुधवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास एका घराला  अचानक आग लागून लाखोंचे नुकसान झाले ही आग खेड न प  च्या अग्निशमन दलाने आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
बहीरवली मोहल्ला येथील रहिवाशी अब्दुला युसुफ चौगुले यांच्या मालकीच्या घराला मध्यरात्री १.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली ही आग इतकी भीषण होती की आगीच्या भक्ष्यस्थानी घर पडले घरातील साहित्य या आगीत बेचिराख होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले.
दरम्यान या आगीची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने खेड न प च्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले मात्र घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन बंबाला अपुऱ्या रस्त्या मूळे पोहचता न आल्याने कर्मचाऱ्यांनी प्लास्टिक टाकी मध्ये पंप टाकून आग आटोक्यात आणली मात्र तो पर्यत घर आगीच्या भक्ष्य स्थानी पडले होते मात्र आजू बाजूच्या घरांना असलेला धोका कमी झाल्याने ग्रामस्थानी निःश्वास टाकला.