सावंतवाडी : सहयोग ग्राम विकास मंडळ, गरड माजगाव आणि जेष्ठ नागरिक संघ सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सहयोग मंडळाचे सचिव मोतिराम टोपले यांनी लिहिलेल्या ‘विळखा’ या एकांकिका संग्रह पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ साहित्यिका सौ. उषा परब यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या वेळी मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर, जेष्ठ नागरिक संघ सावंतवाडीचे अध्यक्ष बळवंत मसुरकर , सचिव प्रकाश राऊळ, खजिनदार अरुण मेस्त्री, मंडळाचे उपाध्यक्ष अण्णा देसाई , सौ मेघना राऊळ ,सौ. मंजिरी मुंडले ,भरत गावडे प्राध्यापक मोहन कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित होते.
या वेळी सौ.मंजिरी मुंडले , सौ मेघना राऊळ यांनी आपले मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. अरुण मेस्त्री यांनी टोपले सरानी लिहिलेल्या एकांकिकाचा आढावा घेऊन शभेच्छा दिल्या. दोन्ही मंडळाच्यावतीने
सौ. उषा परब आणि टोपले सरांचे शांल श्रीफळ मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना सौ. उषा परब म्हणाल्या की ,महाराष्ट्रात सर्वच ठिकाणी अगदी सिंधुदुर्ग ज़िल्हा त सुद्धा एकांकिका स्पर्धा चे आयोजन केले जाते हौशी कला मंडळाना चांगल्या एकांकिकाची गरज असते अश्या मंडळाना आता विळखाच्या रूपाने पाच एकांकिका सादरीकरण साठी उपलब्ध असणार आहेत. त्यांनी टोपले सरांच्या लिखाणाचे भरभरून कौतुक केले.
तसेच त्यांनी एकांकिका आणि नाटक यातील फरक स्पष्ट करुन एकांकिकाचे विषय ,संवाद , पात्र रचना यांजबरोबर सादरीकरण साठी तांत्रिक बाजू एकांकिकेच्या यशासाठी किती महत्वाच्या असतात हे विषत केले मोतीराम टोपले यांच्या एकांकिका या समाज प्रबोधन घडवून आणणाऱ्या आहेत आदर्श वाद मानणाऱ्या आहेत त्याचे अधिकाधिक प्रयोग व्हायला हवेत आणि त्यासाठी आपण स्वतः पुढाकार घेईन असे सांगितले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक दिलीप गोडकर यांनी केले आभार अण्णा देसाई यांनी मानले सूत्र संचालन भरत गावडे यांनी केले.
या वेळी सहयोग ग्राम विकास मंडळ गरड माजगाव,जेष्ठ नागरिक संघ सावंतवाडील,केशव सुत कट्टा मोती तलावचे सर्व पदाधिकारी सदस्य आणि साहित्य प्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते.











