गवारेड्याच्या मुक्त संचाराने वाहनचालकात भीतीचे वातावरण
शिरगाव- साळशी मार्गावरील घटना
शिरगाव | प्रतिनीधी : शिरगाव साळशी मार्गावरील शिरगाव- चौकेवाडी फाट्यानजीक बाबल्या गणपत पवार या दुचाकीस्वाला गवारेड्याने अचानक हल्ला केला यात तो गंभीर जखमी झाला असून दुचाकीचेही मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.हि घटना गुरुवारी रात्री ८.३०. च्या दरम्यान घडली.
देवगड तालुक्यातील साळशी रस्त्यालगत असलेल्या शेतघरात कातकरी समाजबांधव वस्तीत राहणारे बाबल्या पवार हे रात्री ८.३० च्या दरम्यान आपल्या दुचाकीने घराकडे येत असताना चौकेवाडी फाट्यानजीक यांच्यावर गवारेड्याने अचानक हल्ला केल्याने त्यात ते गंभीर जखमी झाले.त्यांच्या उजव्या हाताला व पायाला मुका मार लागला. तसेच दुचाकीचेही मोठ्याप्रमाणात नुकसान होऊन दुचाकीची चेस मोडली.दरम्यान याच मार्गावरुन त्याचे नातेवाईक सत्यवान पवार व त्याची पत्नी दुचाकीने येत असताना गाडीच्या उजेडाने गवारेड्याने तेथून पळ काढला. त्यानी जखमी बाबल्या पवार यास तातडीने शिरगाव खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. त्याच्याावर प्रथमोपचार करण्यात आले. हि घटना समजताच त्याच्या नातेवाईकांनी या खासगी रूग्णालयात धाव घेतली व जखमीची विचारपूस केली.त्यांना अधिक उपचारासाठी शुक्रवारी सकाळी कणकवली येथे खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान परिमंडळ वनअधिकारी देवगड सारीक फकीर यांना हि माहिती मिळताच जखमीची विचारपूस केली.तसेच सारिक फकीर, वनरक्षक रामदास गुगे , कणकवलीचे वनक्षेत्रपाल राजेंद्र गुणकीकर, सामाजिक वनीकरणाच्या वनपाल आशा शिंदे, शिरगाव पोलीस पाटील चंद्रशेखर साटम यानी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. शिरगाव साळशी या मार्गावर सतत गव्याचे दर्शन होत आहे.त्यामुळे वाहनचालकांतून भितीचे वातावरण पसरले आहे.तरी त्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.











