विधान परिषद निवडणुकीत महायुतीचाच डंका

महायुतीचे ९ उमेदवार विजयी

महाविकास आघाडीला धोबीपछाड

मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर लगेचच झालेल्या मतमोजणीत महायुतीचे ९ पैकी ९ उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीला धक्का बसला असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील डेंजर झोन मध्ये आहेत.

विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे योगेश टिळेकर, पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि परिणय फुके हे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. शिंदे गटाचे कृपाल तृमाने, भावना गवळी आणि अजितदादा गटाचे राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे हे उमेदवारही विजयी झाले आहेत.

मतमोजणी अपडेट

महायुतीचे उमेदवार

भाजपा
पंकजा मुंडे – २६ (विजयी)
परिणय फुके – २६ (विजयी)
योगेश टिळेकर – २६ (विजयी)
अमित गोरखे – २६ (विजयी)
सदाभाऊ खोत – २६ (विजयी)

शिवसेना एकनाथ शिंदे गट
भावना गवळी – २४ (विजयी)
कृपाल तुमाने – २५ (विजयी)

राष्ट्रवादी अजित पवार गट
राजेश विटेकर – २३ (विजयी)
शिवाजीरावर गर्जे – २४ (विजयी)

महाविकास आघाडीचे उमेदवार

काँग्रेस
प्रज्ञा सातव – २५ (विजयी)

शिवसेना उद्धव ठाकरे गट
मिलिंद नार्वेकर – २२

राष्ट्रवादी शरद पवार गट
जयंत पाटील(शेकाप) – १