को रे मार्गावर ३१ मार्चपर्यत धावणार मेमु

शनिवार, रविवार, सोमवार या  ३ दिवस वेगवेगळ्या नंबरने धावणार  गाडी 
खेड(प्रतिनिधी) कोंकण आणि मध्य रेल्वेतर्फे ०११५८ चिपळूण पनवेल / ०११५७ पनवेल रत्नागिरी संपूर्ण अनारक्षित ८ डब्यांची मेमू (साप्ताहिक – रविवार) गाडी ३१ मार्च पर्यत कोकण रेल्वे मार्गावर आजपासून सोमवार पर्यत धावणार आहे. ३१ मार्च, २०२४ पर्यंत केवळ दर रविवारी ०११५८ चिपळूण येथून दुपारी ३:२५ ला सुटून पनवेल येथे रात्री ८:१५ ला पोहोचेल आणि ०११५७ पनवेल येथून रात्री ८:२५ ला सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
०११५८ आणि ०११६० चिपळूण पनवेल मेमूचे थांबे : अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमटणे ०११५७ आणि ०११५९ पनवेल रत्नागिरी मेमूचे थांबे : सोमटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड असे आहेत.