गुहागर : शिकारीसाठी फिरणार्‍या 5 जणांना शृंगारतळीत घातल्या बेडया

crime

गुहागर : शिमगोत्सवाच्या धामधुमीत तालुक्यातील शृंगारतळी येथे शिकारीसाठी फिरणार्‍या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शृंगारतळी येथे चेक पोस्ट वर गुहागर पोलीसांनी नाकाबंदी केली असताना अभिजित विजय शेटे ( 41 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुशील सुधीर पवार (32 रा. कांदिवली) जोगेश शंकर भुवड (47 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सचिन सुधाकर पवार (37 रा. पवार साखरी, ता. गुहागर) सुयोग सुधीर पवार (32 रा. पवार साखरी, ता. गुहागर) यांना त्यांच्या ताब्यातील चार चाकी वाहन (एमएच 06-टी 7860 या वाहनामधून एक 12 बोर बंदूक, 4 काडतूस व 2 बॅटरीसह ताब्यात घेतले आहे

याबाबत पोलीस नाईक राजेश शांताराम धनावडे यांनी फिर्याद दिली गुहागर पोलीस ठाणे येथे संशयितांविरोधात भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 7, 25 भारतीय दंड संहिता 34 प्रमाणे135 भारतीय कलम 188 आय पिसि कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणी संशयितांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत आणि पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करत आहेत. सध्या सर्वत्र शिकारचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून गुहागर पोलीस यांचीही धडक कारवाईमुळे शिकारी करणार्‍यांचे धाबे चांगले दणाणले आहेत.