खेड(प्रतिनिधी)
कोकणातील शिमगोत्सव म्हणजे विविधतेने नटलेला उत्सव असतो. शिमगोत्सवा दरम्यान पालखी सोबत विविध सोंगे नाचवण्याची एक वेगळीच परंपरा दिसून येते. त्या प्रमाणेच खेड मध्ये देखील स्वातंत्र्य पुर्व काळापासून शिमगोत्सवाची वेगळी परंपरा आहे.

यात पौराणिक व ऐतिहासिक प्रसंग सादर करून चित्ररथ साकारण्याची परंपरा आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खेड शहर परिसरात चित्ररथ साकारण्यात आले होते. पंचमी च्या आदल्या रात्री शहरातील विविध आळी तून चित्ररथ साकारण्यात येतात त्यातील कुवारसाई-साळीवाडा येथील “वामन अवतार” हा चित्ररथ तसेच कासार आळी येथील “शबरीची बोरं” हे दोन चित्ररथ खास आकर्षक ठरले. या पात्रांची रंगभूषा-वेषभूषा खेड मधील जेष्ठ चित्रकार विनय माळी यांनी केली होती.









