समर्थ कृपा विद्यालयात दीक्षांत समारंभ

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल कनिष्ठ महाविद्यालयात (सीबीएसई) सिनिअर के.जी.च्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ पार पडला.
याप्रसंगी डॉ. मधुरा बाळ, पालक प्रतिनिधी स्वरदा जाधव, सावित्री झांजे यांच्या हस्ते सरस्वती देवीचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. सिनिअर के.जी.च्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी मल्लखांब प्रात्यक्षिके देखील दाखवली. विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एस. एस. अली, विभागप्रमुख श्रेया चाळके, निकी मोरे, मिनाक्षी आंब्रे यांच्यासह पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन मेघा साळुंखे, निदा महाडिक यांनी केले.