भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने आयोजन
आरवली | वार्ताहर : भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा रत्नागिरीकडून भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे येथील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जाकीर शेकासन, कार्यकारीणी सदस्या सौ. फरीदा माद्रे, मकबूल माद्रे, सादिया कापडी, फरहाना मालिम, शिक्षिका बिस्मिल्ला अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी सदिच्छा देण्यात आल्या.