लांजा नं 5 शाळेचा विद्यार्थी दिपराज पांचाळ याची जवाहर नवोदय विद्यालय, राजापूर येथे निवड..

लांजा (प्रतिनिधी) शहरातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लांजा नं ५ या शाळेचा विद्यार्थी दिपराज दीपक पांचाळ याची शहरी भागातून जवाहर नवोदय विद्यालय, राजापूर येथे निवड झाली आहे..

यावर्षी घेण्यात आलेल्या नवोदय विद्यालय परीक्षेचा निकाल ३१ मार्च ला जाहीर झाला होता. यामध्ये दीपराज याने सुयश मिळविले. दिपराजला त्यांचे आई,वडील व शाळेतील शिक्षिका श्रीम. झगडे , अमित जाधव, श्रीम. गावडे यांचे मार्गदर्शन लाभले. दिपराज हा सामान्य कुटुंबातील असून जिद्द व अभ्यासातील सातत्य, कष्ट करण्याची तयारी या त्याच्या अंगभूत गुणांमुळेच हे यश मिळाले असं शाळेच्या मुख्याध्यापिका विमल चव्हाण यांनी सांगितले.

तालुकास्तरीय घेण्यात आलेल्या नवोदय सराव परीक्षेत दिपराज कायम अग्रस्थानी होता. त्यामुळे त्याच्या यशाची खात्री होतीच आणि निकालाने शिक्कामोर्तबही झाले.दिपराजची निवड म्हणजे सामान्य कुटुंबातील हुशार व होतकरू मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने केंद्रीय नवोदय विदयालय स्थापन झाली आहेत, तो उद्देश सफल होतं आहे अशा बोलक्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत..

दरम्यान, दिपराज ची निवड झाल्याबद्दल लांजा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. बंडगर ,शिक्षण विस्ताराधिकारी विनोद सावंग , केंद्रीयप्रमुख चंद्रकांत पावसकर , शाळेच्या मुख्याध्यापिका विमल चव्हाण व शाळेतील शिक्षक तसेच शा.व्य. समिती व सर्व पालक यांनी भेटवस्तू देऊन अभिनंदन केलं.