रमजान ईद मुळे आठवडा बाजार बुधवारी भरणार

 

राजापूर (प्रतिनिधी): गुरूवारी ११ एप्रिल रोजी रमजान ईद असल्याकारणाने शहरात दर गुरुवारी भरणारा आठवडा बाजार या दिवशी बुधवारी १० एप्रिल रोजी भरविण्यात येणार आहे. तशी माहिती नगर परिषद प्रशासनाने एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

गुरूवारी रमजान ईद असल्यामुळे गुरुवारी भरणारा आठवडा बाजार हा बुधवार दिनांक १० एप्रिल रोजी होणार आहे. याची व्यापारी, ग्राहक व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.