रत्नागिरी | प्रतिनिधी :भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री नारायणराव राणे ये रविवारी लांजा आणि रत्नागिरी दौर्यावर येत असून कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहाणार आहेत. त्यांच्या समवेत माजी खासदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत. भारतीय जनता पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात केलेल्या लोकोपयोगी कामे घेऊन मतदारांसमोर जात आहे. भविष्यातील भारताबद्दलचे भाजपचे व्हिजन कार्यकर्त्यांसमोर मांडण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे हे रविवारी लांजा आणि रत्नागिरी दौऱ्यावर येत आहेत.
त्यामधे रविवारी दि. ७एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता लांजा येथील अजिंक्य मंगल कार्यालयात कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे. तर संध्याकाळी ७ वाजता शहरातील स्वयंवर मंगल कार्यालय येथे रत्नागिरी शहर कार्यकारिणी, सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी ना. राणे संवाद साधणार आहेत.
यावेळी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह लोकसभा सहप्रभारी बाळ माने, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहाणार आहेत.
दरम्यान शनिवारचा खंडाळा येथील कार्यकर्ता मेळावा पुढे ढकलण्यात आला आहे. त्याची नवी तारीख लवकरच घोषित करण्यात येणार आहे.











