
बँकेच्या कामकाजाचे कौतुक करत दिल्या शुभेच्छा
राजापूर l प्रतिनिधी : शनिवारी राजापूर तालुका दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री ना. नारायण राणे यांनी राजापूर अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ना. राणे यांनी बँकेच्या एकूणच कामकाजाबाबत कौतुक करत भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी बँकेच्या वतीने अध्यक्षा सौ. अनामिका जाधव यांनी ना. राणे यांचे स्वागत केले.यावेळी सौ. जाधव यांच्या हस्ते बँकेच्या वतीने ना. राणे यांसह सौ. निलमताई राणे, भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांचा सन्मान करण्यात आला.
केंद्रीय उद्योग मंत्री ना. नारायण राणे हे शनिवारी राजापूर दौऱ्यावर आले होते. ओणी येथे आयोजित भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळाव्याला जाण्यापूर्वी त्यांनी राजापूर शहरातील एसटी डेपो समोर असलेल्या राजापूर अर्बन बँकेच्या प्रधान कार्यालयाला सदिच्छा भेट दिली .
याप्रसंगी सौ. निलमताई राणे , भाजप नेते माजी खासदार निलेश राणे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर तसेच भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी राजापूर अर्बन बँकेच्या एकूणच कामकाजाबाबत नामदार राणे यांना माहिती दिली यावेळी ना. राणे यांनी बँकेच्या एकूणच कामकाजाबाबत व प्रगती बाबत कौतुक करत बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी राजापूर अर्बन बँकेचे सर्व अधिकारी रमेश काळे आदींस विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.












