दापोली | प्रतिनिधी: 32 रायगड लोकसभा मतदार संघ अंतर्गत 263 दापोली विधानसभा क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कार्यक्रम आज पार पडला. 07 मे रोजी होणा-या रायगड लोकसभा निवडणुकीकरीता 263- दापोली विधानसभा मतदार संघातील मतदान अधिकाऱ्यांचे निवडणुक प्रशिक्षण सर विश्वेश्वरय्या सभागृह, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे रविवार (ता. 07 एप्रिल) सकाळी व दुपारी अश्या दोन सत्रात श्री. किशन जावळे- निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी रायगड, श्री. शंकर बर्ग-अपर जिल्हाधिकारी रत्नागिरी, श्री.चंद्रकांत सुर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी, रत्नागिरी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
लोकसभा निवडणुकीत तिसऱ्या टप्यात रायगड-रत्नागिरी लोकसभेची निवडणुक होणार असुन या करीता प्रत्यक्ष मतदान 07 मे रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या कालावधीत होणार आहे. या निवडणूकीचे मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी असे एकुण 1776 कर्मचाऱ्यांनी पहिले प्रशिक्षण घेतले. मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर करावयाची कामे, विविध फॉर्म कसे भरावेत याविषयीचे सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दापोली डॉ. अजित थोरबोले यांनी प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांना निवडणुक प्रक्रिया संदर्भात केलेल्या मार्गदर्शनात महसुल कर्मचारी यांनी मतदान केंद्राध्यक्ष व पीआरओ-१ यांना ईव्हीएम मशिन, व्हीव्हीपॅट हाताळणे व त्यांची जोडणी, मॉकपोल, सीआरसी कसे करायचे तर मतदार केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन हाताळणे या निवडणुक प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन केले. यावेळी दापोली तहसीलदार अर्चना बोंबे, मंडणगड तहसीलदार श्रीधर गल्लीपल्ली, अप्पर तहसीलदार श्री.कानशेट्टी, सर्व झोनल अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी व महसुल कर्मचारी यांनी परिश्रम घेतले










