स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब व भाजपा कुवारबाव यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिडा महोत्सवाचे आयोजन
रत्नागिरी : माजी खासदार व भाजपाचे प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वाभिमान स्पोर्ट्स क्लब व भाजपा कुवारबाव यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य क्रिडा महोत्सवाला सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरूवात झाली आहे.
हा क्रिडा महोत्सव दि. २० ते २६ मार्च या कालावधीत पार पडणार असून यामध्ये क्रिकेट, महिला व पुरुष कबड्डी सामने अंतर्भुत आहेत. या क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस राजेशजी सावंत यांंच्याहस्ते पार पडले. यावेळी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष लिलाधार भडकमकर, तालुका अध्यक्ष मुन्ना चवंडे, तालुका सरचिटणीस उमेश कुलकर्णी, तालुका उपाध्यक्ष संकेत कदम, प्रभाकर खानविलकर, पिंट्या निवळकर, चंद्रकांत गराटे, लखन पावसकर, दीपक आपटे, अभि पाडळकर, नितीश आपकरे, रसिक कदम, संकेत शिंदे, प्रशांत पाटिल, विशाल भाट्ये, रतन माने, संतोष चव्हाण, सोहम खानविलकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. क्लबचे अध्यक्ष सतेज नलावडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.