लांजा ( प्रतिनिधी) गणपती चेस अकॅडेमी, लांजाच्या वतीने दि. १ मार्च रोजी त्रिमूर्ती मंगल कार्यालय, लांजा येथे खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाला रुपये २५००/- व ट्रॉफी, द्वितीय रु. १५००/- व ट्रॉफी, तृतीय रु. १०००/- ट्रॉफी अशी बक्षिसे दिली जाणार आहेत.चौथे बक्षिस: रु. ९००/- पाचवे बक्षिस: रु. ८००/-, सहावे बक्षिस: रु. ७००/- सातवे बक्षिस: रु. ६००/- , आठवे ते पंधरावे बक्षिस: ५००/- प्रत्येकी. उत्तेजनार्थ बक्षिसे- ०९, १२, १५ वर्षाखालील तसेच १६-३५, ३६-५५ वयोगटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला ट्रॉफी दिली जाणार आहे. तर सर्वोत्कृष्ट वरिष्ठ खेळाडू (५५+), सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू, सर्वोत्कृष्ट दिव्यागं खेळाडू यांना प्रत्येकी प्रथम क्रमांकाचे बक्षिस रु. ४००/- + ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाचे बक्षिस रु. ३००/- + ट्रॉफी दिली जाणार आहे.
स्पर्धेसाठी २०० रूपये प्रवेश फी आहे. स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळवली जाणार असून सर्वांनी सगळे राऊंड खेळणे आवश्यक आहे. सर्व खेळाडूंनी स्पर्धास्थानी सकाळी ठीक ९.१५ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी :सौ. प्राची रोहित सुर्वे (मयेकर). 9420178311 रोहित सुर्वे. 8208803715 यांचेशी संपर्क साधायचा आहे.











