राजापूर (वार्ताहर): चैत्र शुद्ध प्रतिपदा १९४६ मंगळवार ९ एप्रिल २०२४ या दिवशी नववर्ष स्वागत यात्रा समिती आणि समस्त हिंदु बांधव यांच्या वतीने राजापूर शहर बाजारपेठ व पाचल येथे हिंदु नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
राजापूर येथे यात्रेचा शुभारंभ ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर येथुन सकाळी ९ वाजता होवून जवाहरचौक बाजारपेठ मार्गे, शिवाजीपथ, श्री देव चव्हाटा मंदिर शिवस्मारक चौक येथे सांगता होणार आहे.
तर पाचल येथे श्री हनुमान मंदिर येथून सकाळी ९ वाजता होऊन समारोप श्री महागणपती मंदिर येथे सकाळी १०.३० वाजता होईल. यात्रेचा मार्ग हनुमान मंदिर – जवळेथर फाटा – आठवडा बाजार – महागणपती मंदिर असा असेल.
या यात्रेत परिसरातील समस्त हिंदु बांधवांनी पारंपारिक ( सात्विक) पोशाखात सहभागी होऊन आपले धर्मकर्तव्य बजावावे, असे आवाहन नववर्ष स्वागत समिती आणि समस्त हिंदु बांधव यांनी केले आहे.












