आजचा दिवस कसा जाईल?
18 ऑगस्ट 2024, रविवार
मेष रास
आज इतरांसोबत तुमचे उत्तम बोर्डिंग राहील. तुम्हाला जे वाटते आहे त्यावर विश्वास ठेवा. घर तसेच इतर व्यक्तींची देखील तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. आज तुम्हाला थोडा नकारात्मकतेचा सामना करावा लागेल. इतर गोष्टींपेक्षा स्वतःकडे लक्ष दिल्यास दिवस चांगला जाईल. तुमचा सतत मूड बदलण्याचा इतरांना त्रास होऊ शकतो.
वृषभ रास
आज तुम्हाला अपेक्षित आणि अनपेक्षित अशी सर्वच कामे भराभर कम्प्लीट होतील. पैशाशी संबंधित तसेच इतर कामे होतील. समाधान वाटण्यासारखी परिस्थिती असेल. कुटुंबाची साथ मिळेल. एकत्र वेळ आनंदात घालवता येईल.
मिथुन रास
आज आत्मविश्वासात भर पडेल. ठाम निर्णय घेता येईल. कामाचा परिणाम आनंददायक आणि यश देणारा असेल. तुमच्या कल्पना इतरांना आवडतील. गुड न्यूज कळतील. डोळ्यांची काळजी घ्या. औषधे घेताना चेक करून घ्या. एखादी चूक होऊ शकते.
कर्क रास
आज तुम्ही तुमच्या सारख्या विचारांच्या लोकांच्या सोबत राहण्याचा प्रयत्न करा. परंपरागत चालत आलेल्या वस्तू आणि सेवांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना विशेष लाभ होतील. सल्ला घेऊन काम केल्यास अडचणीतून मार्ग मिळेल.
सिंह रास
आज तुमच्या अपेक्षेनुसार घटना घडणार नाहीत. किंबहुना कोणत्याही स्थितीत तुम्हाला पॉझिटिव्ह काहीच दिसणार नाही. घडून गेलेल्या घटनांवर तुम्ही दुःख करू शकता. वाईट वाटेल. मूड खराब होईल. कशातच मन लागणार नाही.
कन्या रास
आज बिनधास्त पुढे जा. पार्टनरशिप चा विचार करा. योजना आखून काम केल्यास यश मिळेल. टप्प्या टप्प्यात योजना बनवा. ज्या आजच नाही तर पुढेही तुमच्या कामाला येतील. नातेसंबंधात सुधारणा होईल.
तुळ रास
आज सजग राहा. तुमच्या दुर्लक्ष करण्यामुळे, काम टाळण्यामुळे एखादी संधी हातून जाईल. कोणत्याच गोष्टीत मन लागणार नाही. त्यामुळे समाधान वाटणार नाही आणि बोअर वाटत राहील. नवीन काय करू शकता, काय असे आहे की ज्यातून तुम्हाला फायदा मिळेल याचा विचार करण्याची गरज आहे.
वृश्चिक रास
आज विनाकारण काळजी वाटेल. प्रत्येक गोष्ट, एखादी घटना घडून येण्यासाठी काही वेळ जावा लागतो हे लक्षात ठेवा. इन्व्हेस्टमेंट चा विचार करू शकता. परंतु लगेच फायदा देणाऱ्या स्कीम्स मध्ये अडकू नका, प्रॉब्लेम होईल. आजच्या कष्टाचे फळ उद्या मिळेल. आज नशिबाचा फेरा काय असतो हे तुम्हाला कळेल.
धनु रास
आज पुढे जात रहा. मागे जे घडले ते घडले. त्यात अडकून पडू नका. नवीन घर, ऑफिस, गाव, शहर, देश, असे बदल होऊ शकतात. त्याचा फायदा तुम्हाला होईल. नवीन काहीतरी सुरू होईल.
मकर रास
आज तुमच्या नोकरी व्यवसायातून तुम्हाला लाभ होईल. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद घेण्याचा प्रयत्न करा. थोडा वेळ एकांतात घालवण्याची गरज आहे. स्वतःसाठी थोडीफार खरेदी देखील करू शकता. एकूण आनंद आणि समाधान देणारा दिवस.
कुंभ रास
आज तुमच्या कष्टाला फळ मिळताना दिसेल. प्लॅन बनवा त्यानुसार काम करा. इतरांची साथ मिळेल. लागणारे रिसोर्सेस मिळतील. अडकलेली कामे पूर्ण होतील.
मीन रास
आज अति महत्त्वाचे कामे हातावेगळे करा. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होईल. आज थोडा वेळ प्रार्थना करण्यासाठी बाजूला काढा. जमल्यास मंदिरात दर्शनासाठी जा. पुढे येणाऱ्या दिवसासाठी, कामाची तयारी करण्यासाठी, काही वेळ बाजूला ठेवावा लागेल.
@Ritikaslifetherapies
रितिका –
ज्योतिष सल्लागार, अध्यात्मिक मार्गदर्शक
पुणे.
कॉन्टॅक्ट: 9049680353
+++++++++++++++++++++++++++++












