वेंगुर्ले तालुक्यात आज ५ ही मंडळा मध्ये “महाराजस्व अभियान” नागरिकांनी लाभ घ्यावा : तहसीलदार ओंकार ओतारी

वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यात आज सोमवार ४ ऑगस्ट रोजी महाराजस्व अभियान ५ ही मंडळा मध्ये आयोजित केला आहे. सदरील ठिकाणी वेगवेगळ्या दाखल्यांचे वितरण होणार आहे. त्याचबरोबर आवशयक असणाऱ्या बाबींच्या करीता अर्ज ही भरून घेण्याची कामकाजही चालणार आहे. तरी संबंधित मंडळातील नागरिकांनी महाराष्ट्र अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार ओंकार ओतारी यांनी केले आहे.
तालुक्यामध्ये वेंगुर्ला मंडळ –
तहसील कार्यालय, वेंगुर्ला येथे
स. ११ वाजले पासून, शिरोडा मंडळ – रेडी ग्रामपंचायत येथे,
११ वाजले पासून, मातोंड मंडळ मध्ये ग्रामपंचायत होडवडा, येथे
स. ११ वाजले पासून, वेतोरे मंडळ – ग्रामपंचायत वायांगणी येथे दु. २ वाजले पासून, म्हापण मंडळ मध्ये ग्रामपंचायत, म्हापण येथे दु.२ वाजले पासून सुरू होणार आहे. तरी याचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.