कोकण रेल्वे मार्गावर १२ एप्रिल रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक

 

खेड(प्रतिनिधी) कोकण रेल्वेच्या आरवली ते रत्नागिरी सेक्शन दरम्यान . १२ एप्रिल रोजी अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक कोकण रेल्वेकडून घेतला जाणार आहे.

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार रेल्वे मार्गाच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी १२ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७ ते सकाळी ९.३० असा अडीच तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

या मेगाब्लॉकमुळे १२६१७ ही एर्नाकुलम ते हजरत निजामुद्दीन अशी दैनंदिन धावणारी ११ रोजी प्रवासाला निघणारी मंगला एक्सप्रेस मडगाव ते रत्नागिरी दरम्यान १ तास ४५ मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.
मंगला एक्सप्रेस बरोबरच २०९२३ हे तिरूनेलवेली ते गांधीधाम दरम्यान धावणारी लांब पल्ल्याची एक्सप्रेस गाडी जिचा प्रवास ११ एप्रिल रोजी सुरू होतो ती १२ रोजी मडगाव ते रत्नागिरी दरम्यान एक तास दहा मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.