किल्ले रसाळ गडावरील गड वाटेचा संरक्षक कठडा तुटला

खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील राज्य संरक्षित स्मारक असलेल्या किल्ले रसाळगड वर जाणाऱ्या गड वाटेवरील संरक्षक

कठडा तुटून मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे याबाबत दुर्ग प्रेमी वैभव सागवेकर व संकल्प सकपाळ यांनी पाहणी करून प्रशासनाला याबाबत कळवले आहे

 

किल्ले रसाळगड हे तालुक्यातील दुर्ग प्रेमीचे आवडते ठिकाण असून पावसाळ्यात या दुर्गाला अनेक जण भेट देत असतात मात्र सध्या पावसाळा सुरू झाला असल्याने पुरातन काळा मधील असलेल्या पायवाटा व त्यांचे संरक्षक कठडे कोसळत आहेत या किल्ल्याच्या संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात निधी देखील खर्ची टाकण्यात आला आहे मात्र जुनी बांधकामे हळूहळू ढासळू लागली आहेत

 

दरम्यान पावसाळी पर्यटन साठी येणाऱ्या दुर्ग प्रेमींनी स्वतःची काळजी घेऊन या किल्ल्यावर पर्यटन करावे असे आवाहन दुर्ग प्रेमी वैभव सागवेकर यांनी केले आहे