बाळ माने यांच्या तीन फेऱ्या पूर्ण
महायुतीचा उमेदवार कमळाच्या निशाणीवर लढणार
वरिष्ठांकडून नावाची घोषणा लवकरच होणार
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ भाजपातर्फे गणपतीपुळे येथील हॉटेल श्री सागर येथे मालगुंड क्लस्टर बूथ क्र. १२ ची बैठक रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा सहप्रभारी बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रत्नागिरी जिल्ह्यातून प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जनजागृती करण्याच्या इराद्याने करण्यात येणाऱ्या प्रचारासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. या बैठकीला माजी जिल्हाध्यक्ष दत्ता देसाई, तालुकाध्यक्ष विवेक सुर्वे, सरचिटणीस उमेश देसाई तसेच बूथप्रमुख, सुपर वॉरियर्स, पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
आज गुरुवारी २६६ रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील बूथ क्र. १५१ जाकीमिऱ्या येथे गांवसे घर चलो अभियान संपन्न झाले. या वेळी गावातील पाटीलवाडी, बनपवाडी, उपळेकर बाग येथे ५० कुटुंबियांची भेट घेऊन पंतप्रधान श्री. मोदीजींचा नमस्कार सांगितला. या वेळी मोदी शासनाने आपल्या १० वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या लोकोत्तर सेवाकार्याची, सुविधांची आणि निर्णयांची माहिती देत पुन्हा एकदा राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने मोदी सरकार प्रतिष्ठापित करण्यासाठी आपले बहुमूल्य मत एनडीएच्या म्हणजेच कमळाच्या चिन्हावर उभ्या असलेल्या महायुतीच्या उमेदवाराच्या खात्यात टाका, अशी विनंती केली.
या वेळी बाळ माने यांच्यासोबत बूथ प्रमुख दीपक पाटील, राधाकृष्ण कीर, ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश बनप, प्रदीप ऊर्फ गोट्या कीर, श्रेयस शिवलकर, कापा शिवलकर, ओंकार भाटकर, बबन भाटकर, अतुल ऊर्फ बाबा भुते, योगेश तांडेल, हेमंत सावंत, समीर तांडेल, मनोज तांडेल, संतोष तांडेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते. अबकी बार ४०० पार, फिर एक बार मोदी सरकार अशा घोषणा देत या वेळी वातावरण भारून टाकले.












