रेवतळे येथे तरुणाची आत्महत्या

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहर रेवतळे येथील सुनिल महादेव खरात (वय ३२) या तरुणाने नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. याप्रकरणी त्याचा भाऊ विनय खरात याने मालवण पोलीस स्थानकात खबर दिली आहे.

 

सुनिल खरात हा रेवतळे येथे भाडयाच्या खोलीत रहात होता. बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास विनय खरात याला सुनिल हा गळफास लावलेल्या स्थितीत दिसला. रेवतळे येथील नागरिकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालय प्रशासनाने त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी विलास टेंबुलकर हे अधिक तपास करीत आहेत.