काजूच्या बागेत वृद्धा मृतावस्थेत आढळली

नाद भोळेवाडी येथील स्मिता रघुनाथ पाष्टे(६५) या वृध्देचा आकस्मिक मृत्यु झाला. ती मृतावस्थेत आढळून आली आहे.ही घटना शनिवारी सायंकाळी ४ वा.सुमारास निदर्शनास आली.

याबाबत मिळालेल्या माहीतीनूसार, स्मिता पाष्टे या शनिवारी सकाळी ११ वा.सुमारास त्यांचा काजुच्या बागेत गेल्या होत्या.सायंकाळी ४ वा.सुमारास त्या मृतावस्थेत दीसल्या.वाढत्या उष्म्यामुळे दुपारी पडून त्यांचा मृत्यु झाला असावा अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यांचा पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परीवार आहे.