घेरापालगड मध्ये घर आगीच्या भक्ष्यस्थानी लाखोंची हानी

खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील घेरापालगड येथील अनिल आत्माराम सुर्वे यांचे कौलारू घर आगीत जळून खाक झाले. मंगळवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. तब्बल ४ तासानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीत लाखोंची हानी झाली असून म्हैसही गंभीररित्या भाजली या। आगीचे नेमके
कारण समजू शकले नाही.

रात्रीचे जेवण आटोपून ग्रामस्थ झोपेच्या तयारीत असतानाच त्यांना सुर्वे यांच्या घरातून आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे निदर्शनास आले. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. घरातील सर्व सदस्यांना सुखरुप बाहेर काढल्याने जीवितहानी टळली.

आगीने रौद्ररुप धारण केल्याने नगर परिषदेच्या अग्निशमन केंद्रास आले. मात्र नगर कळवण्यात परिषदेच्या अग्निशमन बंबामध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन बंबास पाचारण करण्यात आले. रस्ता अरुंद असल्यामुळे आग लागलेल्या घरापासून ३०० मीटर अंतरावरच अग्निशमन बंब थांबवण्यात आला.
तेथूनच सिंटेक्सच्या टाक्यांमधून पाणी नेऊन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. ग्रामस्थही मदतकार्यात गुंतले होते.

लोटे औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्राचे उप अग्निशमन अधिकारी ए. जी. सरवदे, चालक
एम. एस. मोरे, अग्निशमन निमोचक एम. डी. पाचंगणे, व्ही. एस. खेडेकर, एन. पी. नांगरे आदी कर्मचाऱ्यांनीनआग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मध्यरात्री २ च्या सुमारास धुमसणारी आग आटोक्यात आणण्यात यश आले. आगीत सुर्वे कुटुंबियांच्या घरातील सर्व साहित्य बेचिराख झाले