चाटव- वाडीबीड पूल खुला होण्याची प्रतीक्षेत!

पुलाजवळून जाणाऱ्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे खोडा, महावितरणचे दुर्लक्ष
खेड(प्रतिनिधी) खेड तालुक्यातील चाटव- वाडीबीड जगबुडी नदीदरम्यान ३ कोटी रूपये खर्चून पुलाची पुर्नबांधणी करण्यात आली. मात्र या पुलाजवळून उच्च दाबाची विद्युत वाहिनी जात असल्यामुळे पूल वाहतुकीसाठी खुला होण्याच्या मार्गात खोडा पडला आहे. याबाबत महावितरणला सातत्याने निवेदने देऊनही अद्याप वीज वाहिनी हटवण्याची तसदी घेतलेली नाही. यामुळे हा पूल  वाहतुकीसाठी खुला होण्याच्या प्रतीक्षेत आहे.
नांदिवली मार्गावरील पूल कमकुवत झाला होता. अतिवृष्टीदरम्यान पुलावरून पाणी वहात असल्याने वाहतूक ठप्प होवून दळणवळणाची प्रक्रिया थांबते. या पुलाची उंची वाढवून पुनर्बांधणीसाठी ग्रामस्थांनी प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नाबार्डमधून  ३ कोटीचे अंदाजपत्रक  निधीची तरतूद करण्यात आली होती
नव्याने पूल बांधताना पुन्हा उंची वाढवण्यात आली. मात्र या ठिकाणी  विद्युतरोहित्रला जोडलेली उच्च वाहिनी जात असल्याने पूल खुला झालेला नाही. बांधकाम विभागाने महावितरण  कार्यालयाकडे विद्युत खांब हलवण्यासाठी पत्रव्यवहार व  आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे  मात्र अद्याप कार्यवाही न झाल्याने  कोट्यवधीचा पूल वाहतुकी होण्याच्या प्रतीक्षेत आहे.