रविवार १४ एप्रिल रोजी राजापूरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उद्घाटन लोकार्पण सोहळयाचे आयोजन

 

 

राजापूर (वार्ताहर): राजापूर तालुका बौध्दजन संघ, मुंबई /ग्रामिण यांच्या वतीने भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ वा जयंती महोत्सव आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उद्घाटन लोकार्पण सोहळा रविवार १४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.

यानिमित्त दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे अनावरण केले जाणार आहे.

रविवार १४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता धम्म ध्वजारोहण, १०.३० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन उद्घाटन समारंभ, सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण, सकाळी ११.३० ते दु. १२.४५ बुद्ध पुजा पाठ (सुत्त पठण) व धम्मदेसना पूज्य भन्ते डॉ. खेमधम्मो महाथेरो दु. १२,४५ ते २.३० जाहीर सभा, दु. २.३० ते ३.३० स्नेहभोजन, सायंकाळी ४ ते सायं. ७ वाजता धम्मरॅली, सायं. ७ ते ७.३० वाजता राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा महाअंतीम फेरी, रा. ७.३० ते रा. ८ वाजता राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा अंतीम फेरी, रात्रौ ८ ते ९ वाजता राज्यस्तरीय गीतगायन महाअंतीम फेरी, रात्रौ ९.३० ते १० पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.

या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून राजापूर तालुका बौध्दजन संघ, मुंबईचे अध्यक्ष शिवराम हरळकर, ग्रामिणचे अध्यक्ष महादेव गोठणकर, समाजसेवक प्रकाश जाधव (पन्हळेकर), सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी नंदकुमार जाधव तर या सोहळयाला भन्ते डॉ. खेमधम्मो महाथेरो यांची प्रमुख उपस्थीती लाभणार आहे.

तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ साहित्यीक, कवी, लेखक ज. वि. पवार, जेष्ठ साहित्यीक, कवी, लेखक प्रा. शुक्राचार्य गायकवाड, सिद्धार्थ महाविद्यालय, पाली विभाग मुंबई प्रा. विजय मोहिते उपस्थीत राहणार आहेत.

या सोहळयाला सर्वांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन राजापूर तालुका बौध्दजन संघ मुंबई व ग्रामिण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.