खासदार विनायक राऊत विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी : आ. आशिष शेलार 

महायुतीचा उमेदवार दोन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येणार 

सावंतवाडी : रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाला मोठी परंपरा आहे. बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते, सुरेश प्रभू ते डॉ. निलेश राणे यांनी आपापल्या कार्यकाळात या मतदारसंघाच्या विकासासाठी भरीव योगदान दिले.

मात्र, आपल्या दहा वर्षाच्या कार्यकालातील आठ वर्षे मोदींच्या नेतृत्वातील सत्तेत असूनही स्थानिक खासदार विनायक राऊत हे विकासाच्या बाबतीत सपशेल अपयशी ठरले. शैक्षणिक व्यवस्थेपासून ते रोजगारापर्यंत कोणतेही भरीव कार्य ते करू शकले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित असून महायुतीचा उमेदवार दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल असा विश्वास आ. आशिष शेलार यांनी व्यक्त केला.