खेडमध्ये कणकवलीतील मुख्याध्यापकाचा आकस्मिक मृत्यू

खेड (प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गा वरील आबाचा ढाबा या ठिकाणी जेवण करत असताना एका ५३ वर्षीय मुख्याध्यापक चा  अचानक मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली.
राजेश भालचंद्र वाळके (वय ५३ वर्ष) व्यवसाय मुख्याध्यापक (शिवडाव माध्यमीक विद्यालय) सध्या रा. मु.पो. शिवडाव मांगरवाडी ता कणकवली जि.सिंधुदुर्ग यातील मयत हे आबाचा ढाबा ता. खेड येथे जेवण करित असतांना त्यांना अचानक अस्वस्थ वाटु लागल्याने ते चक्कर येउन खाली पडले म्हणुन उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय कळंबणी येथे दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी राजेश भालचंद्र वाळके यांना तपासून मयत घोषीत केले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू ची नोंद केली आहे