चिचंघरमध्ये दारू धंद्यावर धाड; ३५ लिटर दारू जप्त

crime daru
खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील चिचघर रेवेचीवाडी येथील बस स्टॉपच्या पाठीमागील मोकळया जागेत सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू धंद्यावर येथील पोलिसांनी अचानक धाड टाकून ४ हजार रुपये किमतीची ३५ लिटर दारू जप्त केली. या प्रकरणी अशोक पांडुरंग सुर्वे वय – ५६ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील सुर्वे  हा  गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशिररीत्या लोकांना चढ्या भावाने विक्रीकरणेसाठी आपले ताबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ मिळुन आला त्याच्या कडून  ४ हजार- रु. किं. चे ३५ लीटर हातभट्टी गावठी दारू जप्त करण्यात आली.