डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामुहिक पुस्तक वाचन संपन्न

क्षितीज कलामंचाचा स्तुत्य उपक्रम

दापोली | प्रतिनिधी: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आणि एक प्रमुख भारतीय सण व उत्सव आहे. हा सण दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतासह जगभरात साजरा केला जातो. हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला ‘समता दिन’ म्हणून तर महाराष्ट्र शासन ज्ञान दिन म्हणून साजरा करते. या दिनाचे औचित्य साधत क्षितिज क‌लामंच दापोलीकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अनोखी मानवंदना देशात आली. दापोलीतील सुमारे ४०० विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाचन करुन बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. यामध्ये सहा शाळा सहभागी झाल्या होत्या.

पुस्तके म्हणजे बाबासाहेबांचा जीव. बाबासाहेब बारा बारा तास वाचन करत असतं. पुस्तक वाचनाची आवड विद्यार्थामध्ये निर्माण व्हावी म्हणून क्षितिज कलामंच दापोलीने अनोखा व अभिनव उपक्रम राबवला. पुस्तकांचे वाचन करुन बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. दापोली येथील क्षितिज कलामंचे संस्थापक सुनील कदम यांच्या संकल्पनेत दापोली तालुक्यातीक सहा शाळा सहभागी झाल्या. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा चंद्रनगर, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा अडखळ- कदमवाडी, जिल्हा परिषद आदर्श केंद्रशाळा आसूद नंबर १, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श मराठी शाळा कर्दे , जिल्हा परिषद केंद्र शाळा टाळसुरे नंबर १, आणि न्यु इंग्लीश स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज टाळसुरे आदी शाळा सहभागी झाल्या होत्या.

या शाळेतील ४०० विद्यार्थांनी सामुहिक पुस्तक वाचन करून बाबासाहेबाना मानवंदना दिली. सह‌भागी सर्व शाळांमधील मुलांनी १३ तारखेला सकाळी ९ ते १० या वेळेत पुस्तकांचे वाचन केले. नाणी हा अनोखा उपक्रम यशस्वी करण्यासाठी टाळसुरे येथिल शाळेत या उपक्रमासाठी जेष्ठ साहित्यिक सुदेश मालवणकर उपस्थित होते त्यांनी वि‌द्यार्थांना पुस्तक आणि बाबासाहेबांच नात समजावून सांगितले. न्यु इंग्लीश स्कुल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक संदेश राऊत यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांचे संस्थापक सुनिल कदम व अध्यक्ष अभिजित भोंगले यांनी आभार मानले. या उपक्र‌माअंतर्गत प्रविण मर्चडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना पेन उपलब्ध करुन दिले. हा अनोखा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्षितीज कलामंच सर्व सदस्यांनी मेहनत घेतली.