दापोली तालुक्यातील विवेक महाडिक यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेत्तर पुरस्कार 2025

दापोली :

दापोली तालुक्यातील आर.जी. पवार माध्यमिक विद्यालय माटवणचे ग्रंथपाल व रत्नागिरी जिल्हा ग्रंथपाल संघटनेचे उपाध्यक्ष विवेक शांताराम महाडिक यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्याक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने त्यांचेकडून दिला जाणारा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन दापोली तालुका माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने करण्यात आले.
विवेक महाडिक यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील अर्धवेळ ग्रंथपालांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी, बंधुभाव, मानवता निर्माण करणारे आहे. त्यातूनच समाजामध्ये समता व एकता वाढीस लागली आहे. अशा उल्लेखनीय कार्यातून आदर्शाचे नवे मापदंड निर्माण झालेले दिसून आले. मानवता व विश्वशांती स्थापित होण्याच्या दृष्टीने विवेक महाडिक यांचे कार्य प्रेरणादायी आहे. विवेक महाडिक यांच्या सेवेतून सामाजिक न्याय व अपेक्षित परिवर्तनासाठी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने विवेक महाडीक यांना राज्यस्तरीय गुणवंत ग्रंथपाल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

दापोली तालुका माध्यमिक अध्यापक संघाचे अध्यक्ष दिपक पवार, कार्याध्यक्ष सत्यवान दळवी, सचिव चंद्रकांत मोरे, दापोली तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संतोष हजारे, माजी संचालक गिरीश पाटील, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक पतपेढी रत्नागिरी व्हाईस चेअरमन किशोर नागरगोजे, मुख्याध्यापक संभाजी कोंडीकिरे, मुख्याध्यापक पांडुरंग ढेरे, प्रो- कबड्डी पंच आशुतोष साळुंखे, शिक्षक विकास पाटील, शिक्षक चौगुले यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त विवेक महाडीक यांची पत्नी मानसी महाडिक कन्या मृण्मयी व मानस कन्या निधी यांच्या समवेत सत्कार करण्यात आला.