वेंगुर्ला-परबवाडा येथील शिबिरात ७६ रक्तदात्यांचे रक्तदान

महिला रक्तदात्यांचा सहभागही लक्षवेधी

जि.प. शाळा नं. १ च्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजन

वेंगुर्ले । प्रतिनिधी : वेंगुर्ला परबवाडा जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा नंबर १ या शाळेच्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून येथील आयुष चॅलेंजर मित्रमंडळ,कणकेवाडी व परबवाडा मित्रमंडळ,वेंगुर्ला आयोजित सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान शाखा वेंगुर्लाच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण ७६ रक्तदात्यांनी सहभाग घेतला,त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. दरम्यान, जिएमसी ब्लड बँक वेंगुर्ला तालुक्यात व विशेष म्हणजे परबवाडा गावात प्रथमच येत असल्याने ग्रामस्थांमध्ये मोठा उत्साह व औत्सुक्य दिसून येत होते.जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा परबवाडा नं १ या शाळेच्या शताब्दी महोत्सवाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या शिबिरासाठी गोवा – बांबोळी येथील जीएमसीची ब्लड बँक सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग,बांदा व सातार्डा येथे रक्तदान शिबिरे घेतली गेली.त्याचप्रमाणे वेंगुर्ला तालुक्यात रक्तदान शिबीर घेण्यासाठी सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन दि.२४ जानेवारी २०२३ रोजी या वर्षातील ४ थे रक्तदान शिबीर घेऊन गोवा व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रक्ताचे नाते अधिक बळकट केले.

या रक्तदान शिबिराचे उदघाटन परबवाडा येथील ज्येष्ठ नागरिक रवींद्र परब,बाळा दळवी,शाळेच्या शताब्दी महोत्सवाचे अध्यक्ष डॉ.बाळू गवंडे, जीजी परब,तंटामुक्ती अध्यक्ष सुनील परब,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप परब,जिएमसी ब्लड बँकेचे डॉ.संजय कोरगावकर, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा उपाध्यक्ष महेश रारूळ,सावंतवाडी – वेंगुर्ला – दोडामार्ग तालुका विभागीय अध्यक्ष व जिएमसी ब्लड बँक समन्वयक संजय पिळणकर,माजी नगरसेवक यशवंत किनळेकर,वेंगुर्ला कार्यकारिणी अध्यक्ष ऍलिस्टर ब्रिटो, उपाध्यक्ष राजेश पेडणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत दीपप्रज्वलनाने करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आयुष चॅलेंजरचे नाना राऊळ,शाळा व्यवस्थापन समिती व परबवाडा ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयेश परब यांनी केले तर आभार नाना राऊळ यांनी मानले.