सावंतवाडी | प्रतिनिधी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी आज सावंतवाडी येथील भाजपच्या कार्यालयाला भेट दिली. भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, ॲड. परिमल नाईक आदी उपस्थित होते.
या लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपण प्रचार दौरे करणार आहे असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले .
त्यांनी मतदार संघात जुन्या कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे .सावंतवाडीत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर ,उमेश कोरगावकर राजा शिवाजी चौक मित्र मंडळातील पदाधिकारी तसेच कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी चर्चा केली.
शिवराम दळवी सध्या राजकारणापासून अलिप्त होते . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला होता. त्यानंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत तटस्थ होते. मात्र, आता पुन्हा एकदा ते ह्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यांनी आज भाजपच्या कार्यालयात भेट देत पुन्हा एकदा प्रचारकार्य हाती घेतले आहे.
श्री. दळवी यांच्यावर मुंबईचीही जबाबदारी देण्यात आली आहे .त्यांचे सुपुत्र गोपाळ दळवी ,सिद्धिविनायक दळवी हेही मुंबईमध्ये राजकारणात सक्रिय आहेत. माहितीच्या उमेदवाराला सावंतवाडी मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्यासाठी आपण गावोगावी जाऊन गाठीभेटी घेणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.












