रामनवमीनिमित्त सावंतवाडी शहरात भव्य शोभायात्रा

रामनामाच्या जयघोषाने शहर राममय

विहिंपतर्फे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी : विश्व हिंदू परिषद सावंतवाडी आणि सकल हिंदू धर्मियांच्यातर्फे सावंतवाडीकरांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव नारायण मंदिर येथे श्री राम जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त सायंकाळी सावंतवाडी शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमुळे संपूर्ण शहर भगवेमय व राममय झाले होते.


श्री देव नारायण मंदिर येथून सुरु झालेली ही शोभायात्रा सालईवाडा, बाजारपेठमार्गे काढण्यात आली. यावेळी जय श्रीरामाचा जयघोष करण्यात आला. याप्रसंगी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले, उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष केशव फाटक, प्रखंड मंत्री विनायक रांगणेकर, प्रसिद्धी प्रमुख किशोर चिटणीस, प्रसाद अरविंदेकर, प्रकाश रेडकर, अण्णा म्हापसेकर, राजू केळूसकर, माजी नगरसेवक आनंद नेवगी, अँड. संजू शिरोडकर, दिलीप भालेकर, स्वागत नाटेकर, मोहिनी मडगावकर, ॲड. अश्विनी लेले, कृष्णा धुपळणवर, विनोद सावंत, गौतम माठेकर, प्रथमेश प्रभू, सुरज मठकर, संदीप निवळे, जीजी राऊळ, ओंकार सावंत, सुनिल सावंत, देवदास सावंत, विनोद सावंत, राजू गोवेकर आदींसह मोठ्या संख्येने रामभक्त उपस्थित होते.