वैभववाडीत भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष
वैभववाडी l प्रतिनिधी : कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर होताच वैभववाडी भाजपाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. फटाक्याची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून नारायण राणे यांची उमेदवारी आज जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नारायण राणे आगे बढो… हम तुम्हारे साथ है. भारतीय जनता पार्टीचा विजय असो… वंदे मातरम अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी भाजपा पदाधिकारी भालचंद्र साठे, अरविंद रावराणे, नेहा माईणकर, हुसेन लांजेकर, बंड्या मांजरेकर, प्राची तावडे, रोहन रावराणे, नवलराज काळे, मारुती मोहिते, संजय चव्हाण, रत्नाकर कदम, सुंदरी निकम, यामिनी वळवी, विवेक रावराणे, प्रकाश पाटील, प्रकाश सावंत, बाळा मोरे, सुभाष रावराणे, राजू पवार, अवधूत नारकर, संतोष पवार, उदय पांचाळ, स्वप्नील खानविलकर, आदित्य चव्हाण, श्रेयस नेवरेकर, प्रदीप नारकर, श्री नेवरेकर, बंधू वळंजु, श्री. भुतार्णे, दीपक माईणकर, अनंत फोंडके व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.












