मालवणात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष…

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग उमेदवारी जाहीर होताच कार्यकर्त्यांत मोठा उत्साह 

चार लाख मताधिक्याने राणे साहेबांचा विजय निश्चित : दत्ता सामंत यांनी व्यक्त केला ठाम विश्वास 

अमित खोत | मालवण : भाजप जेष्ठ नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुती कडून उमेदवारी जाहीर होताच सिंधुदुर्गात भाजपा कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा करताना विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला जात आहे. मालवण कांदळगाव येथे भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांनी श्री देव रामेश्वर मंदिर येथे एकत्र येत जल्लोष केला.

 

अब की बार चारसो पार… फिर एक बार मोदी सरकार…. नारायण राणे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है… राणे साहेबांचा विजय असो… महायुतीचा विजय असो… अश्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच फटाका्यांची अतिशबाजी करण्यात आली.

 

राणे साहेब चार लाख मताधिक्याने विजयी होतील. असा ठाम विश्वास भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. ठाकरे गटाचे खासदार दहा वर्षात विकासकामे करण्यात अपयशी ठरले असून त्याना मतदार जागा दाखवून देतील. असेही दत्ता सामंत यांनी सांगितले.

 

यावेळी यावेळी भाजप प्रांतिक सदस्य दत्ता सामंत, जिल्हाउपाध्यक्ष अशोक सावंत, विजय केनवडेकर, डॉ मिलिंद कुलकर्णी, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, राजन वराडकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर,आप्पा लुडबे, गणेश कुशे, पंकज सादये, ओबीसी महिला तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, अंजली लिलाधर पराडकर व सहकारी , महेश मांजरेकर, प्रमोद करलकर, विकी तोरसकर, खरेदी विक्री संघ अध्यक्ष राजन गांवकर, संचालक आबा हडकर, जॉन नरोना, नारायण धुरी, संतोष पालव, रवी टेंबूलकर, छोटू सावजी, भाऊ मोरजे, शामा मुळये, संतोष पारकर, आबा साळकर, उमेश कोदे, भाऊ गुरव, संजय परब, मधुसूदन परब, विशाल राणे, अमोल वारंग, संतोष मुसळे, आबा साळकर, शारदा मुळये, संजना परब, भाग्यश्री डिचवलकर, भाजप युवा मोर्चा पदाधिकारी सौरभ ताम्हणकर, मंदार लुडबे, संग्राम साळसकर, ललित चव्हाण, निनाद बादेकर, कुणाल खानोलकर, राजु बिडये, रवी मालवणकर, विहार कोदे, भाई मांजरेकर, दादा कोचरेकर, संजय कदम, यशा मालंडकर, सुशील शेडगे यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपास्थित होते.