खेड लायन्स क्लबला आंतरराष्ट्रीय लीडरशिप सन्मान

खेड (प्रतिनिधी) खेड लायन्स क्लब ऑफ सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीतून वर्षभरात जनहितकारक उपक्रम राबवत कौतुकास्पद कामगिरी केल्याबद्दल येथील लायन्स क्लबला सर्वोच्च आंतरराष्ट्रीय लीडरशिप चा सन्मान प्राप्त झाला आहे.
 महाबळेश्वर येथे झालेल्या लायन्सच्या विभागीय समारंभात लायन्स क्लबचे आंतरराष्ट्रीय संचालक चव्हाण व विभागीय गव्हर्नर भोजराज नाईक निंबाळकर यांच्या हस्ते हा सन्मान लायन्स क्लब ऑफ सिटीचे अध्यक्ष रोहन विचारे यांनी स्वीकारला.
 शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांची उपलब्धतता करून देत शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याची कामगिरी लायन्स क्लबकडून केली जात आहे. याशिवाय विविध संस्थांना महिनाभर पुरेल इतके जीवनावश्यक साहित्य देखील वितरीत केले जात आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत सर्वोच्च आंतरराष्ट्रीय लीडरशिप चा सन्मान खेड लायन्स क्लबला प्राप्त झाल्याबद्दल सर्वच स्तरांतून – अभिनंदन करण्यात येत आहे.