काटवली येथे २३ रोजी मुग्धा भट सामंत यांची गाण्याची मैफल

माखजन |वार्ताहर :      संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नजीक काटवली येथे हनुमान जयंती निमित्त मंदिरात २३ एप्रिल रोजी रत्नागिरीतील प्रख्यात गायिका मुग्धा भट सामंत यांची गायन मैफिल रंगणार आहे.

शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताची ही मैफिल २३ रोजी रात्री ११ वाजता होणार आहे.या मैफिलीत तबला साथ हेरंब जोगळेकर तर हार्मोनियम ची साथ श्रीरंग जोगळेकर करणार आहेत.या मैफिलीचा आस्वाद घेण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.