पत्नीच्या चारित्र्यावर संशय, पत्नीने जीव गमावला, सुरीने हल्ला करत पत्नीचा केला खून

देवगड तालुक्यातील महाळुंगे धनगरवाडी येथे पती-पत्नीमध्ये वाद होऊन पतीने पत्नीचा खून केला आहे.

ही खळबळ जनक घटना आज साडे अकराच्या सुमारास घडली पत्नी सुप्रिया सुनिल पेडणेकर( 50 व पती सुनील सदानंद पेडणेकर 58 यांच्यात घरगुती कारणास्तव टोकाचे वाद झाले. सुप्रिया पेडणेकर ही भगतगिरी करत होती. या भगतगिरीसाठी येणाऱ्या माणसांबद्दल सुनील पेडणेकर कायम संशय घ्यायचा यातून प्रचंड वाद होत होते
मुंबई येथील एका रुग्णालयामध्ये सुनील पेडणेकर मेडिकल स्टोर चालवत होता 2022 रोजी हे कुटुंबीय महाळुंगे धनगरवाडा येथे आले . मुलगा सिद्धेश्वर हे तिघेही तेथे राहत होते सुप्रिया ही भगतगिरी करत असे याच कारणामुळे पती-पत्नीमध्ये टोकाचे वाद होत होते. सुनील व सुप्रिया यांचा मुलगा सिद्धेश सकाळी शौचालयाला गेला असताना त्याला आई-वडिलांचे वाद कानावर पडले मात्र तो बाहेर आलेला असताना सुप्रियाच्या छातीवर बसून सुनील तिच्यावर सुरीने वार करत होता हे त्याने पाहिले हे वार मानेवर छातीवर हातावर केले. रक्तस्त्राव प्रचंड झाल्याने सुप्रिया चा जागीच मृत्यू झाला असावा. विजयदुर्ग पोलिसांनी देवगड ग्रामीण रुग्णालयामध्ये सुप्रियाला दाखल केल्यावर ती मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी घोषित केले.

या कामी विभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक थोपडे, विजयदुर्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रशांत जाधव, विलास राठोड, गणेश भोवड, देवेंद्र मुंबरकर, संतोष डांबरी, विक्रम कोयंडे