राष्ट्रीय रक्तधोरण व्यवस्थापनांतर्गत रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे वाढीव शुल्क कमी करा

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या सावंतवाडी कार्यकारिणीची मागणी

तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर

सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान

सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या सावंतवाडी कार्यकारिणीमार्फत राष्ट्रीय रक्तधोरण व्यवस्थापनांतर्गत रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे वाढीव शुल्क कमी करण्याबाबत आज तहसिलदार, सावंतवाडी तसेच गटविकास अधिकारी, सावंतवाडी यांना निवेदन देण्यात आले. सावंतवाडी तालुका कार्यकारिणीच्या वतीने सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. एकनाथ चव्हाण व सावंतवाडी तालुका खजिनदार श्री. सिद्धार्थ पराडकर या द्वयींनी हे निवेदन मा. तहसिलदार, सावंतवाडी यांना सादर केले.

“सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग” ही रक्तदान, अवयवदान, देहदान इत्यादी सत्कार्याकरीता कार्यरत राहणारी राजकारणविरहीत नोंदणीकृत संस्था आहे, वेळेवर रक्तपुरवठा करुन एखाद्याचा जीव वाचविणे हे संस्थेचे आद्यकर्तव्य आहे. त्याचप्रमाणे सामाजिक जबाबदारी म्हणून शासनाच्या धोरणाला अनूसरुन रक्तदान चळवळीबाबत विविध रास्त मागण्यांबाबत योग्य निवेदने देणे, हाही संस्थेच्या कार्याचा एक भाग आहे.

संस्थेने आत्तापर्यंत अविश्रांतपणे अनेक रक्तदान शिबिरांचे सुद्धा यशस्वी आयोजन आपण केले आहे. अनेकांना रक्त उपलब्ध करुन दिले आहे, आर्थिक दुर्बलांना रक्तकार्डही दिले आहे, प्रसंगी पैसेही दिले आहेत. रक्ताबरोबरच प्लेटलेटस, प्लाझ्मा दानही संस्थेच्या सदस्यांनी केले आहे, जिल्ह्यात सुमारे २००० सदस्य हे करत आहेत, जिल्ह्यातील ८ तालुके व तेथील प्रतिष्ठानच्या तालुका शाखांचे पदाधिकारी अत्यंत उत्कृष्ट कार्य करत आहेत, जिल्ह्यातील एकूण ७४३ गावामध्ये उपरोक्त विषयांची जनजागृती संस्था सदस्य करत आहेत.

ज्या गावात कधीही रक्तदान शिबिरे झाली नाहीत अशा अनेक गावांनी रक्तदान शिबिरे घेतली व पुन्हा नियमित घेण्याचे अभिवचनही दिलेय. संस्थेचे सर्व सदस्य कोणतीही रक्त, प्लेटलेटस्, प्लाझ्मा विषयक मागणी होताच अत्यंत तळमळीने ती पूर्ण करतातच. तो पाठपुरावा वाखाणण्याजोगा असतो. ही संस्था काही महत्त्वाच्या नियमांवर चालत असून एका महान समाजकार्याशी बांधील आहे, तसेच आपापल्या क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी या संस्थेमध्ये सहभागी आहेत. या पार्श्वभूमीवर संस्थेकडून सदरची मागणी करण्यात आली आहे.

Sindhudurg