महायुतीचे उमेदवार ना.नारायण राणे यांचे दोन्ही उमेदवारी अर्ज ठरले वैध 

9 उमेदवारांच्या दाखल 13 पैकी 8 उमेदवारांचे 12 अर्ज वैध 

 

रत्नागिरी : महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या दोन नामनिर्देशन अर्जंसह 9 उमेदवारांचे 12 अर्ज छाननीमध्ये वैध ठरले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

20 एप्रिल रोजी छाननी पर पडली. 9 उमेदवारानी 13 अर्ज भरले आहेत. 7 उमेदवारांनी 19ला अर्ज भरले आहेत.

एकाने 4 तर एकाने 2 अर्ज भरले आहेत

शकील सावंत यांचा पाहिला अपक्ष उमेदवार वैध झाला आहे

विनायक भाऊराव राऊत यांनी 16 ला 3 आणि 19 ला 1 असे चारही अर्ज वैध झाले आहेत

अमृत तांबडे हे अपक्ष उमेदवार वैध झाले आहेत

सुरेश शिंदे सैनिक समाज पार्टीचे उमेदवार अर्ज वैध ठरले आहे

विनायक लवू राऊत अपक्ष यांचा अर्ज वैध झाला

बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र आयरे यांचा अर्ज वैध ठरला आहे

वंचित बहुजन आघाडी मारुती जोशी यांचा अर्ज वैध ठरला आहे

भारतीय जनता पार्टीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांचे दोन्ही अर्ज वैध ठरले आहेत

 

बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक गंगाराम पवार यांचा अर्ज मात्र सध्या प्रलंबित असून 8 उमेदवारांचे 12 अर्ज वैध एकाच अर्ज प्रलंबित असून 1 वाजेपर्यंत एक कागद आणण्याची वेळ असून त्यानंतर या अर्जबाबत योग्य निर्णय घेतला जाईल असे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली.