रिंगणे येथे मंगळवारी त्या दिवशी काय घडल’ या दोन अंकी रहस्यमयी नाट्यप्रयोग

 

लांजा (प्रतिनिधी) हनुमान जयंतीचे औचित्य साधुन दि. २३ एप्रिल रोजी रात्री १०.३० वा. रिंगणे गावातील जय हनुमान सेवा मंडळाच्यावतीने लेखक गो. ग. पारखी लिखित `त्या दिवशी काय घडल’ या दोन अंकी रहस्यमयी नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. तरुण उभरते रिंगणे गावातील दिग्दर्शक अनिरुद्ध सुनिल पेडणेकर यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले असुन संगितकार प्रणव सोनावणे यानी नाटकाला संगित दिले आहे.

 

रिंगणे गावातील मोजक्या काही जुण्या मंडळांपैकी एक जय हनुमान सेवा मंडळ रिंगणे स्थापने पासुनच दरवर्षी हनुमान जयंतीचे औचित्य साधुन रंगभुमीवर नवनविन नाट्य प्रयोग सादर करते. या रंगभुमीवर केवळ नाटकांचे सादरीकरण हा केवळ उद्देश नसुन नवनवीन कलाकार, संगितकार, नेपथ्यकार, वेशभूषाकार, दिग्दर्शक घडविण्याचे काम अविरत केले जात आहे. यावर्षी `त्या दिवशी काय घडल’ या रहस्यमयी दोन अंकी नाटकाचे सादरीकरण केले जाणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन तरुण दिग्दर्शक अनिरुद्ध सुनिल पेडणेकर यांनी केले असुन आकाश सरफरे, सुरज सनगरे, मनोज पेडणेकर, सिध्देश बारे, ईराध्य आयरे, प्रितेश बारे, यज्ञेश पेडणेकर हे नवखे कलाकार वेगवेगळ्या भुमिका साकारणार आहेत. तर अनुभवी कलाकार विलास पेडणेकर व स्त्री कलाकार पुजा पेडणेकर व प्रतिक्षा पेडणेकर हे मुख्य भुमिका निभावताना दिसतील.

 

दरम्यान, प्रतिकूल परिस्थितीत अनेक परंपरांचा अस्त होत असताना जय हनुमान सेवा मंडळ, रिंगणे सातत्याने तरुणांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहुन दरवर्षी नाट्य सादरीकरणाची ही परंपरा जोपासत असुन नविन कलाकार घडवित आहे. मंडळाच्या या प्रयत्नाला पाठिंबा दर्शविण्यासाठी मोठ्या संख्येने नाटक पहायला येण्याचे आव्हाहन मंडळाच्यावतीने केले जात आहे.