आंगले येथे ग्रामदेवता श्री चंडिका माता आणि देवतांचा प्रतिष्ठापणा सोहळा

३० एप्रिल ते ०२ मेपर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन

राजापूर (वार्ताहर): तालुक्यातील आंगले येथील ग्रामदेवता श्री चंडिकामाता व इतर देवतांची मूर्ती प्रतिष्ठापना व पालखी भेट भव्य सोहळा मंगळवार दि. ३० एप्रिल ते गुरूवार दि.०२ मे या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

 

आंगले येथील ग्रामदेवता श्री चंडिका माता आणि अन्य देवतांच्या मुर्तीचा जिर्णोध्दार करण्यात आला असून नूतन मुर्ती प्रतिष्ठापना केली जाणार आहे. यानिमित्त मंगळवार दि.३० एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता पुण्याहवाचन, देवता स्थापना, होमहवन, जलाधिवास, महाप्रसाद, हरिपाठ, स्थानिक भजन. बुधवार दि. १ मे रोजी पुण्याहवाचन, देवता स्थापना, पूर्णाहूती, महाआरती, महाप्रसाद, हळदीकुंकू, हरिपाठ, हरी ओम सत नाम वारकरी संप्रदाय मुरादपूर संगमेश्वर यांचे किर्तन, दीपोत्सव, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे हरीकिर्तन आदि कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यावेळी प.पू. उल्हासगिरी महाराज उपस्थित राहणार आहेत.

 

गुरूवार दि. ०२ मे रोजी सकाळी ६ वाजता श्रीसत्यनारायण महापूजा, पालखी आगमन, पूजन, महाप्रसाद तसेच संध्याकाळी ४ वाजता पालखीभेट व नृत्य, सुस्वर भजन, महाप्रसाद, सत्कार समारंभ व रात्री १० वाजात आंगले येथील राऊत वरचीवाडी श्रीहनुमान सेवा नाट्य नमन मंडळ यांच्या बहुरंगी नमनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या सोहोळ्याची जययत तयारी ग्रामस्थांकडून हाती घेण्यात आली असून या सोहळयाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्रीदेवी चंडिका श्री ब्राम्हणदेव श्री देव रामेश्वर ट्रस्टच्यावतीने करण्यात आले आहे.