खेड(प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील धामणी-कातेवाडी येथील श्री कृष्ण हनुमान मित्र मंडळाच्यावतीने आयोजित हनुमान जन्मोत्सव सोहळ्यास २२ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे. यानिमित्त विविधांगी धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२३ रोजी सकाळी ४ वाजता काकडा आरती व ह.भ.प. मोहन महाराज व योगेश महाराज यांच्या उपस्थितीत हनुमान जन्म सोहळा होईल. सकाळी ९ वाजता सत्यनारायणाची महापूजा, सकाळी १० वाजता ह.भ.प. नारायण वाजे महाराज यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर किशोर ठसाळ यांच्या सौजन्याने दुपारी १२ वाजता महाप्रसाद होईल. उत्सवाच्या यशस्वीतेसाठी धामणी – कातेवाडी ग्रामस्थ मुंबई मंडळाचे अध्यक्ष रूपेश काते, उपाध्यक्ष भास्कर काते, सचिव नीलेश खेडेकर, कार्याध्यक्ष महेंद्र काते, खजिनदार ऋषिकेश काते, उपखजिनदार गणेश काते यांच्यासह पदाधिकारी प्रयत्नशील आहेत, या उत्सवात बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.












