
महायुती बैठकीत निर्धार
राजापूर (वार्ताहर):राजापूर येथे महायुती कार्यकर्ता समन्वय समितीची बैठक उत्साहात नुकतीच पार पडली. या बैठकीला रविंद्र चव्हाण यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
कुठल्याही कामात समन्वय असला, की ते काम यशस्वी होतं. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचा प्रचार करताना आपल्या परिसरातील कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखण्याची महत्त्वाची जबाबदारी तुम्हा सर्वांवर आहे. तेव्हा वक्तशीर, सुनियोजित आणि समन्वय साधून प्रचार करा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांशी बोलताना केले.
याप्रसंगी भाजपा दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे किरण सामंत, राहुल पंडीत, सौ. उल्का विश्वासराव, सौ. शिल्पा मराठे, अशफाक हाजू, सुरेश गुरव, सुयोगा जठार यांच्यासह महायुतीचे स्थानिक पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.











