उद्धव ठाकरे यांनी पावसात भिजू नये आजारी पडतील : ना. दीपक केसरकर

सावंतवाडी :
परभणी येथे उद्धव ठाकरे यांनी भर पावसात सभा घेतली. आता असे भावनिक प्रकार केले तरीही त्याचा जनतेच्या मनावर काहीही परिणाम होणार नाही. उलट त्यांची प्रकृती नाजूक असून उगाच पावसात भिजल्यास ते आजारी पडतील त्यामुळे त्यांनी अशी स्टंटबाजी करू नये, असा उपरोधिक सल्ला मंत्री दीपक केसरकर यांनी दिला. सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.