सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सुसाट: आगामी वर्षाचा 16 कोटी 99 लाखाच्या मुळ अर्थसंकल्पास मंजूरी!

Google search engine
Google search engine

नागरिकांच्या आरोग्यासाठी मधु संजीवनी योजना!

जिल्ह्यातील भजनी मंडळांना साहित्याचे संच देणार!

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर

यावर्षीचा 3 कोटी ११ लाख शिल्लकेसह 20 कोटी 88 लाखाच्या अंतरिम सुधारित अर्थसंकल्पास मंजुरी!

शेतकऱ्यांसाठी हळद व नाचणी लागवडी साठी योजना

सिंधुनगरी | बाळ खडपकर : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने प्रथमच यावर्षीच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील भजनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना भजनी साहित्याच्या संच पुरविण्याची योजना जाहीर केले आहे. यावर्षीचा म्हणजे सन 2022-23 चा 3 कोटी ११ लाख शिल्लकेसह 20 कोटी 88 लाखाच्या अंतरिम सुधारित अर्थसंकल्प जिल्हा परिषदेने मंजूर केला तर आगामी वर्षाचा म्हणजे सन 2023-24 चा 99 लाख महसुली शिल्लकेसह 16 कोटी 99 लाख खर्चाचा अर्थसंकल्प सोमवारी मंजूर केला. प्रशासक तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. नागरिकांच्या आरोग्यासाठी मधु संजीवनी योजना, जिल्ह्यातील भजनी मंडळांना साहित्याचे संच देणारी योजना, जिल्ह्यातील बागायतीना आगी लागून होणाऱ्या नुकसानी साठी अनुदानाची योजना, जिल्हा परिषदेचे प्रशासकीय भवन अधिकारी कर्मचाऱ्यांची निवासस्थाने तसेच महत्त्वाच्या शाळा यांच्या दुरुस्तीची तरतूद, आगामी कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या प्रदर्शनासाठी भरीव तरतूद, दुग्धोत्पादन वाढीसाठी योजना व हळद लागवड अशा विविध योजनांसाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद झाल्याने हा अर्थसंकल्प वैशिष्ट्यपूर्ण ठरला.
जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी प्रशासकीय कारकिर्दीत हा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लवी गावडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक उदय पाटील अन्य विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. यावेळी मोठ्या प्रमाणात सापेक्ष अनुदान व कळस रूपातील अन्य अनुदान शासनाकडून प्राप्त झाल्याने जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढले आहे जिल्हा परिषदेचा हा अर्थसंकल्प वाढला आहे अशी माहिती वल्लवी गावडे यांनी दिली.

अर्थसंकल्प सादर करणे हे काम लोकप्रतिनिधींचे असून तीन महिन्यात प्रशासकीय राजवट असेल असे वाटले होते. लोकनियुक्त प्रशासन आल्यानंतर अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार योजनांची अंमलबजावणी होईलच पण आता मंजूर झालेल्या अर्थसंकल्पानुसार नवीन वर्षात म्हणजे एप्रिल पासूनच सर्व खाते प्रमुखांनी सादर झालेल्या योजना प्रमाणे काम करावे व वेळेतच निधी खर्च करावा अशा सूचना याच बैठकीत प्रजित नायर यांनी दिल्या
जिल्ह्यात शुगर, ब्लड प्रेशर हे रुग्ण मोठ्या प्रमाणात असन प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय मार्फत एवढ्या मोठ्या प्रमाणातील रुग्णांची तपासणी शक्य होत नाही म्हणून अशा स्वयंसहायिकांमार्फत शुगर व ब्लड प्रेशर तपासणीची यंत्रणा देऊन या जिल्ह्यात मधु संजीवनी योजना राबविण्याचा संकल्प जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलीपे यांनी केला होता. त्यामुळे या योजनेचा या अर्थसंकल्पात समावेश केल्याचे ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केले.

यावर्षी जिल्हा परिषदेचे मूळ बारा कोटीचा अर्थसंकल्प होता त्यात वाढ झाली असून अंतिम सुधारित अर्थसंकल्प 20 कोटी 88 लाख 86 हजार तीनशे रुपये पर्यंत गेला आहे. प्रशासकीय राजवट केवळ तीन महिन्यात राहील अशी अपेक्षा होती पण ती वाढत गेली व आता वर्ष संपत आले. त्यामुळे पहिल्या काळात खर्च करता आला नाही. लोकनियुत्त राजवट येईल व हा खर्च होईल असे वाटले. परंतु ही राजवट लांबल्यामुळे सुधारित अर्थसंकल्प आम्ही तयार केला व नव्या योजनांचा समावेश करून त्याचे अंमलबजावणी सुरू केली. 31 मार्च अखेर पर्यंत विविध योजनांचा निधी खर्च करून निधी व योजना एप्रिल पासूनच हाती घेण्यात येतील व प्रत्येक महिन्याला निधी खर्च होईल असे नियोजन सर्व विभागानी करावे असा सूचनाही मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यावेळी दिल्या.

ग्रामपंचायत विभागाने भजनी मंडळांना साहित्य वाटप करण्याचा प्रस्ताव या अर्थसंकल्पात आम्ही स्वीकारला. खरे तर या अर्थसंकल्पात सर्वच विभागानी नाविन्यपूर्ण योजना सुचविल्यात,प्रत्येक विभागाचे या अर्थसंकल्पात योगदान आहे, या महत्त्वाच्या सूचनांचा आम्ही या अर्थसंकल्पात समावेश केला असेही प्रजित नायर यांनी सांगितले. ग्रामपंचायत विभागाने प्रथमच भजनी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी दहा लाखाची तरतूद या अर्थसंकल्पात मागितली होती ती त्यांना देण्यात आली आहे. जिल्ह्यात अनेक गावांमध्ये भजनी कलाकार असून भजनी मंडळ आहेत. त्यांना अनेक भजने त्याला सादर करण्यासाठी साहित्याची आवश्यकता असते केसांच्या या योजनेमधून पुरविले जाणार आहेत. पुणे व पालघर जिल्ह्यात अशी योजना होती त्याच धर्तीवर ही योजना या जिल्ह्यातील राबित असल्याचे प्रजित नायर म्हणाले. मंडळाची निवड त्यासाठीचे नियम निश्चित झाले असून त्याचे अंमलबजावणी ग्रामपंचायत विभाग करणार आहे. ही योजना एप्रिल पासून सुरू होईल.

जिल्ह्यात रक्तदाब मधुमेह याचे रुग्ण मोठ्या प्रमाणात असून आरोग्य विभागाने या रुग्णांसाठी मधु संजीवनी योजना सुचवले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खालीपे यांनीही योजना दिली असून ती योजनाही या वर्षीपासून जिल्हा परिषदेने हाती घेतली आहे.जिल्ह्यात 50 पटावरील प्राथमिक शाळा नादुरुस्त असून त्या दुरुस्त व्हाव्यात या उद्देशाने यावर्षी दीड कोटीची तरतूद या अर्थसंकल्पात ठेवली आहे.कृषी विभागाला चालना देण्यासाठी यावर्षी हळद आणि नाचणी लागवडीला प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी ही आर्थिक तरतूद ठेवण्यात आली आहे. यावर्षी लवकरच जिल्हा परिषदेचे पशुपक्षी प्रदर्शन भव्य दिव्य पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे त्यासाठीही 40 ते 45 लाखाची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.

जिल्हा परिषदेचे प्रशासकीय भवन व जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची निवासस्थाने नादुरुस्त असून त्यांच्या शपथ दुरुस्तीचा प्रस्तावही अनेक वर्षे प्रलंबित होता त्यालाही या अर्थसंकल्पात स्थान दिले आहे. जिल्हा परिषद भवन शिष्यवृत्ती व्हावे या भारतीची गळती दूर व्हावी निवासस्थानांची दुरुस्ती व्हावी दिनेश व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी ही अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे काम गतिमान व्हावे यासाठी संगणक प्रणाली आणखी सक्षम व्हावे जुन्या संगणकांचे निर्लेखन करून नवीन संगणक प्रणाली खरेदी करण्यासाठी यावर्षी भरीव तरतूद ठेवण्यात आले आहे जेणेकरून जिल्हा परिषदेचे कामकाज आणि अधिक गतिमान पद्धतीने करता येईल अशी अपेक्षा आहे. दुधाळ जनावर योजनेस सिंधुदुर्ग जिल्हा बँक गोकुळ यांच्या मदतीला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने हात दिला आहे. जिल्ह्यात 30 हजार दुधाचे संकलन होत असून ते एक लाखापर्यंत वाढविण्यासाठी कृत्रिम रेतन व त्याबाबतचे प्रशिक्षण उमेदवारांना देण्याची योजना हाती घेतली आहे व त्यासाठी आर्थिक तरतूद करण्यात आले आहे. नागरिकांचे आरोग्य शिक्षण कृषी व पशुसंवर्धन विभाग बांधकाम व ग्रामपंचायत विभाग महिला बालकल्याण व समाज कल्याण विभाग महिला बालकल्याण विभागासाठी कुपोषित बालकांसाठी पोषण आहाराची योजना अशा विविध व नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश या अर्थसंकल्पात झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी विद्यार्थी पशुपालक महिला या विविध घटकांना योजना देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.लेदर बॅग द्वारे अर्थसंकल्प सादर करण्याची आतापर्यंतचे परंपरा असून आता हायटेक प्रणालीवर अर्थसंकल्प सादर होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावेळी टॅब द्वारे अर्थसंकल्प सादर केला होता या जिल्हा परिषदचा ही पुढील अर्थसंकल्प त्याद्वारे होईल अशी अपेक्षाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी व्यक्त केली.