लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी विजयाची हॅट्रिक करतील : सौं. निलमताई राणे

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय ही लाखोंच्या मताधिक्याचा असेल

मालवण येथील महिला मेळाव्यात उपस्थितानी व्यक्त केला ठाम विश्वास

अमित खोत | मालवण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप युती सरकारच्या माध्यमातून जनहिताच्या, महिला सक्ष्मीकरण दृष्टीने अनेक योजना आणल्या. महिला सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले. सर्वसामन्य जनतेला न्याय देत असताना प्रगतीपथावर विकसित दिशेने आपला भारत वाटचाल करत आहे. याचे श्रेय लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असून आगामी लोकसभा निवडणुकीत जनतेच्या मोठ्या पाठिंब्याने ते विजयाची हॅट्रिक करतील. सोबतच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे लाखोंच्या मताधिक्याने खासदार होतील. असा विश्वास सौं. निलमताई राणे यांनी मालवण येथे बोलताना व्यक्त केला.

मालवण शहर दैवज्ञ भवन येथे सौं. निलमताई राणे यांच्या प्रमुख उपास्थितीत भाजप महिला मोर्चा पदाधिकारी तसेच महिला भगिनी यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाली. उत्स्फूर्त असा प्रतिसाद या बैठकीला लाभला.

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष स्नेहा कोरगावकर, प्रांतिक सदस्य संध्या तेरसे, प्रांतिक सदस्य रश्मी लुडबे, तालुका अध्यक्ष पूजा करलकर, माजी उपनगराध्यक्ष शर्वरी पाटकर, शहर अध्यक्ष अन्वेषा आचरेकर, माजी नगरसेविका ममता वराडकर, पूजा सरकारे, महिमा मयेकर, न्हिवेकर, तारका चव्हाण, अर्चना मिठबावकर, दिव्या कोचरेकर यांसह अन्य महिला पदाधिकारी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मोठ्या मताधिक्याच्या विजयासाठी महिला मोर्चा पदाधिकारी, महिला भगिनी सज्ज आहेत. जनतेचा मिळणारा प्रतिसाद पाहता विजयी बहुमताचा असेल असा ठाम विश्वास उपस्थितानी व्यक्त केला.

महिला सक्ष्मीकरणला प्राधान्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या एमएसएमई मंत्रालय मार्फत विविध योजना महिला सक्ष्मीकारण दृष्टीने राबवण्यात येत आहेत. तसेच देश पातळीवर अनेक योजना महिला केंद्रस्थानी ठेऊन आणल्या. असेही सौं. निलमताई राणे यांनी सांगितले.